आनंददायी शिक्षण
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 आला अन आनंददायी शिक्षणाची संकल्पना अधिक दृढ झाली खरंच सध्याचे शिक्षण आनंददायी आहे हे मात्र खरे .गरज आहे ती आनंददायी शिक्षण आनंदाने देण्याची थोडक्यात असे म्हणता येईल की आनंद घेत दिले जाणारे अध्ययन अनुभव म्हणजे आनंददायी शिक्षण होय.
आनंददायी शिक्षणातून प्राप्त झालेले अध्ययन अनुभव हे निरंतर स्मरणात राहणारे असतात . आनंददायी शिक्षणातून शोधकवृत्ती निरीक्षण क्षमता आत्मविश्वास तर्कसंगती आदि बौद्धिक कौशल्य विकसित होतात हे मात्र खरे.
आनंददायी शिक्षणाची गुरुकिल्ली
अडथळ्यांची करू पायमल्ली
वाढवू गुणवत्तेची वृक्षवल्ली !!
No comments:
Post a Comment