फोटो गॅलरी

                          

                                      माझे बालदोस्त.....!
  इयत्ता  १ ली ते चौथी
  (  २०१६ ते २०२०   )

      



                             
                           इयत्ता चौथीतून पाचवीत गेलेल्या माझ्या लाडक्या बालदोस्तांनो......!!!!

प्रिय मुलांनो
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
मुलांनो खरं सांगू आज जाणवली तुमची उणीव कारण तुमच्या नित्याच्या सहवासात आपण शिक्षक मित्र भाऊ दादा किंबहुना निभावल आई बाबांचं नातं...यातूनच घडत गेला शिक्षणाचा प्रवास...अन या प्रवासातील पुराव्यांचे तूम्ही आहात साक्षीदार....शिक्षणाची ही साक्ष तुमच्या स्पंदनात नितांत राहणार यात शंकाच नाही ....आपल्या कृतीतून वर्तनातून अन मनाच्या घाबाऱ्यातून शिक्षणाच्या प्रवाहातून तुम्ही यशाचं शिखर गाठाल हे मात्र नक्की खात्री आहे माझी....तुमच्या आठवणी  मनाच्या पटलावर तरळत राहतील हे नक्की....
            आपला सहवास शैक्षणिक प्रक्रियेतून बदलला असला तरी आपण नेहमीच सोबत असणार हे वास्तव आहे...तुम्हा सर्वानाच खूप जवळून अनुभवलंय अगदीं आई बाबा याचे साक्षीदार आहेत....तुमच्या इतकेच तुमचे पालक हा सहकार्याचा निर्झरच आहे म्हणूनच हा प्रवास यशस्वी करण्यात त्यांचाही वाटा मोठा आहे यात शंका नाही....शिक्षणातील अनेक पद्धती मी वापरल्या पण तेवढ्याच नेटानं तुम्ही साथ दिली अन मी प्रयोगात निष्कर्षापर्यंत पोहोचलो अन यशस्वी ही झालो.
       हो खरंच आपला ठरलं होतं प्रत्येकाबद्दल मी लिहिणार पण या परिस्थितीला हे मान्य नसावं म्हणूनच सर्वांसाठीचा हा प्रपंच एकत्र लेखणीतून साकारला असं मला वाटतं . 
       यापुढे असेच सहकार्य एकमेकांना करून आपले जीवन समृद्ध करूया अन हा शिक्षण प्रवास चालत राहू....सजग राहू....सुरक्षित राहू......!!!!!
🤝🤝🤝🤝🤝🤝
       ऋणानुबंधाच्या  गाठी....
    आयुष्यासाठी.....!!!!
                   तुमचा                                          
                 सुलभक               
💐💐💐💐💐💐
शब्दांकन :  
श्री. कृष्णा पांगारे
✍️✍️✍️✍️✍️✍️


                               बालभारती पुणे कार्यशाळा








 

मान्यवर शाळा भेट

 





ई लर्निंग अध्यापन

 









 

 

 

मराठी राजभाषा दिन

 









 











 
























No comments:

Post a Comment