Tuesday, 23 February 2021

ज्ञानरचनावादी कार्यशाळा

                                                                 ज्ञानरचनावादी कार्यशाळेतील क्षणचित्र

बालसुलभ वातावरण

                                           बालसुलभ वातावरण

आनंददायी शिक्षण

                                           आनंददायी शिक्षण

      बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 आला अन आनंददायी शिक्षणाची संकल्पना अधिक दृढ झाली खरंच सध्याचे शिक्षण आनंददायी आहे हे मात्र खरे .गरज आहे ती आनंददायी शिक्षण आनंदाने देण्याची थोडक्यात असे म्हणता येईल की आनंद घेत दिले जाणारे अध्ययन अनुभव म्हणजे आनंददायी शिक्षण होय.
       आनंददायी शिक्षणातून प्राप्त झालेले अध्ययन अनुभव हे निरंतर स्मरणात राहणारे असतात . आनंददायी शिक्षणातून शोधकवृत्ती निरीक्षण क्षमता आत्मविश्वास तर्कसंगती आदि बौद्धिक कौशल्य विकसित होतात हे मात्र खरे.

   आनंददायी शिक्षणाची गुरुकिल्ली
    अडथळ्यांची करू पायमल्ली
    वाढवू  गुणवत्तेची वृक्षवल्ली !!

बालस्नेही शिक्षण

                                         बालस्नेही शिक्षण

  बालकांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये त्यांचे कुटुंब , परिसर यांच्या बरोबर शाळेलाही अनन्य साधारण महत्त्व आहे. शाळा ही बालकांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकास करणारे केंद्र आहे म्हणून शाळेमध्ये राबवली जाणारी शिक्षण प्रक्रिया बालकाच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा सर्वंकष विचार करून राबवली जाणे आवश्यक आहे.
       सुलभकाने बालकाच्या कुटुंबासारखे परिसरासारखे स्नेहमय वातावरण शाळेच्या परिसरात निर्माण केले तर ते निश्चितच फलदायी ठरेल . विदयार्थी_विद्यार्थी, विद्यार्थी_सुलभक ही आंतरक्रिया सहज व सुलभ होऊ शकेल.
        शाळा परिसर हा शालेय शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचा घटक आहे . शाळा परिसराचा वापर करून बालकाला आवडेल असे बालसुलभ  शालेय वातावरण निर्माण करायला हवे....!
 
बालस्नेही शिक्षणास उपयुक्त शैक्षणिक साहित्य
 
बाल सुलभ वातावरण

                                                                        ( संदर्भ '  बालस्नेही शिक्षण)

बालकेंद्रित शिक्षण

                                         बालकेंद्रित शिक्षण

"बाल कामधील बालपण कायम  टिकवून दिले जाणारे शिक्षण म्हणजे बाल केंद्रित शिक्षण.....!"
   शिक्षणाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी असून शिक्षक हा दिशा दाखवणारा , सुविधा पुरवणारा ,सुविधा निर्माण करून देणारा सुविधादाता आहे.  बालकांच्या उपजत बुद्धीचा विचार करून त्या गुणांचा विकास होईल असे शैक्षणिक वातावरण आपल्याला निर्माण करावे लागेल व बालकांच्या शिकण्यात येणारे अडथळे , अडचणी आपण दूर करायला हव्यात ,आपण शिक्षक या नात्याने  विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून योग्य अध्ययन अनुभव , योग्य अध्ययन अध्यापन पद्धती  यांची निवड करून घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास  बालकांना अध्ययनात गोडी निर्माण होईल ,
       मुले केंद्रस्थानी घेऊन मुलांना आवडेल  मुलांना सोपे जाईल  असे मुलांनी आपले आपण  शिकणे आणि आपण त्यांना शिकायला मदत करणे असे शाळेत घडेल तर किती मजा येईल....!