बालकांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये त्यांचे कुटुंब , परिसर यांच्या बरोबर शाळेलाही अनन्य साधारण महत्त्व आहे. शाळा ही बालकांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकास करणारे केंद्र आहे म्हणून शाळेमध्ये राबवली जाणारी शिक्षण प्रक्रिया बालकाच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा सर्वंकष विचार करून राबवली जाणे आवश्यक आहे.
सुलभकाने बालकाच्या कुटुंबासारखे परिसरासारखे स्नेहमय वातावरण शाळेच्या परिसरात निर्माण केले तर ते निश्चितच फलदायी ठरेल . विदयार्थी_विद्यार्थी, विद्यार्थी_सुलभक ही आंतरक्रिया सहज व सुलभ होऊ शकेल.
शाळा परिसर हा शालेय शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचा घटक आहे . शाळा परिसराचा वापर करून बालकाला आवडेल असे बालसुलभ शालेय वातावरण निर्माण करायला हवे....!
( संदर्भ ' बालस्नेही शिक्षण)
No comments:
Post a Comment